बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

बिबट्या
बिबट्या

पारगाव : पुढारी वृत्तसेवा: शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गाढवे मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. ही घटना रविवारी (दि .10) पहाटे तीन वाजता घडली. त्यामुळे गाढवे मळा शिंगवे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शिंगवे गावाच्या उत्तरेला गाढवेवस्ती आहे. तेथे गेणभाऊ राघू गाढवे हे शेतकरी राहतात. त्यांच्या कडे असलेल्या तीन गाई व दोन शेळ्या घरा लगत असलेल्या गोठ्यात बांधल्या होत्या.

गोठ्याला चोर बाजूने लोखंडी तारेची जाळी आहे परंतु वरून गोठा रिकामाच आहे.रविवारी (दि. 10 ) बिबट्याने जाळीवरून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गोठ्यात उडी मारून त्यातील दोन शेळ्यांना जागीच ठार केले. यावेळी आवाजाने गाढवे कुटुंब बाहेर आले.बिबट्याने तेथून पळ काढला होता. दोन शेळ्या जागीच ठार झाल्याने गाढवे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news