बावधन येथे दोन ऑफिस फोडले

file photo
file photo

पिंपरी : शटर उचकटून चोरट्यांनी दोन ऑफिसमधून दोन लाख 78 हजरांचा ऐवज चोरून नेला. या घटना सोमवारी (दि. 22) मध्यरात्री बावधन येथे घडल्या. दशरथ शिवराज भद्रशेट्टे (32, रा. म्हाळुंगे, पुणे ) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे संगम एंटरप्रायजेस आणि रोहित मारुती सोनवणे (42, रा. नवी सांगवी) यांचे लिंक लॉजिस्टिक नावाने ऑफिस आहेत. दरम्यान, ऑफिस कुलूप लावून बंद असताना चोरटयांनी ऑफिसचे शटर, कॅमेरा आणि ग्रील तोडून आत प्रवेश केला. शॉपमधून दोन लाख 76 हजार 384 रुपये रोख रक्कम आणि बिलिंगसाठी वापरत असलेली मशीन चोरून नेली. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news