बावडा : पेरूचे दर वधारले! उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा

बावडा : पेरूचे दर वधारले! उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा
Published on
Updated on

बावडा; पुढारी वृत्तसेवा: मागील 15 दिवसांपासून पेरूच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने पेरू शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सध्या पेरूला बागेत जागेवर प्रति किलोस 65 ते 75 रुपये एवढा समाधानकारक दर मिळत आहे, अशी माहिती बावडा येथील पेरू उत्पादक शेतकरी व सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक महादेव घाडगे यांनी शुक्रवारी (दि. 2) दिली. पेरूस 15 दिवसांपूर्वी प्रति किलोस फक्त 30 ते 40 रुपये एवढा दर होता. मात्र गणेशोत्सव, पुढे येणारा दुर्गोत्सव यामुळे पेरूला मागणी वाढली आहे.

परिणामी सध्या पेरूस प्रतिकिलोस 65 चे 75 रुपये दर मिळत आहे. येथील महादेव घाडगे यांची 2 एकर क्षेत्रावर पेरूची बाग असून, शुक्रवार (दि. 2) पासून बागेतील पेरूची तोडणी चालू झाली आहे. त्यांचा एक पेरू सरासरी 300 ते 350 ग्रॅम वजनाचा असून शुक्रवारी हो पेरू बंगळूर बाजाराकडे रवाना झाला. घाडगे यांनी पेरूची तैवान पिंक या वाणाची रोपे हैदराबाद येथून गेल्या वर्षी आणली. त्यानंतर 12द्ब8 फूट अंतरावर लागवड केली. वेळोवेळी औषध फवारणी व तण व्यवस्थापन केले.

बागेमध्ये पेरूचे फळ लागल्यानंतर त्यांनी फळावर फोम व त्यावरती प्लॅस्टिक पिशवी लावली आहे. त्यामुळे फळास उन्हापासून तडे गेले नाहीत व फळाची चकाकी कायम राहिली आहे. पेरूची तोडणी दिवाळीपर्यंत सुरू राहील असे महादेव घाडगे यांनी सांगितले. त्यांना बागेच्या व्यवस्थापनासाठी बंधू शंकरराव घाडगे, अंकुश घाडगे, रणजित घाडगे आदी कुटुंबीयांचे सहकार्य मिळत आहे. दरम्यान, इंदापूर तालुक्यात गेली पाच वर्षांपासून पेरू पिकाखालील क्षेत्र वाढत चालले असून, युवा शेतकरी वर्ग त्यामध्ये मोठ्या संख्येने दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news