बालिकेच्या शवविच्छेदनानंतर खुनाचा गुन्हा दाखल; घटनेची माहिती देणार्‍यास बक्षीस जाहीर

बालिकेच्या शवविच्छेदनानंतर खुनाचा गुन्हा दाखल; घटनेची माहिती देणार्‍यास बक्षीस जाहीर
Published on
Updated on

महाळुंगे इंगळे; पुढारी वृत्तसेवा: मेदनकरवाडी (ता. खेड) येथून बुधवारी (दि. 10) बेपत्ता झालेल्या चारवर्षीय बालिकेच्या मृतदेहाचे गुरुवारी (दि.11) उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बालिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला असून मृतदेहाचा कमरेखालचा एक अवयव गायब आहे. अतिशय निर्दयीपणे हा खून करण्यात आला आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. कृष्णा सतेंद्र ठाकूर (वय 4 वर्षे, 4 महिने) असे मृत बालिकेचे नाव आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नाही.

या गुन्ह्यात एका लहान निष्पाप, निरागस मुलीचा निर्घृणपणे अमानवीरीत्या खून करण्यात आलेला आहे. घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ही लहान मुलगी सुमारे चार दिवसांपूर्वी भगत वस्ती, मेदनकरवाडी, (चाकण, ता. खेड) येथे राहण्याकरिता आई-वडिलांसोबत परप्रांतातून आलेली होती. बुधवारी (दि.10) दुपारी भगत वस्ती, मेदनकरवाडी चाकण येथून ती बेपत्ता झालेली होती. गुरुवारी (दि. 11) सकाळी बेपत्ता झालेल्या ठिकाणापासून जवळच मेदनकरवाडी येथील शेतामध्ये तिचा मृतदेह सापडला आहे.

या मुलीस बुधवारी (दि. 10) दुपारी 2.15 वाजलेनंतर कोणासोबत कोणी पाहिले असल्यास अथवा या घटनेबाबत काही माहिती असल्यास संबंधितांनी ही माहिती पुढील पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मोबाईल नंबरवर कळवावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. तसेच माहिती देणार्‍यास योग्य ते रोख बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संपर्क क्रमांक : सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट : 9823563640, वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने : 7875144771 आणि वैभव शिंगारे : 8689807776, उपनिरीक्षक विजय जगदाळे : 9763004858, हवालदार सचिन मोरे : 9850901942 जवान राजकुमार हनमंते 9834490718.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news