बालकांच्या आधार कार्डसाठी मोहीम

बालकांच्या आधार कार्डसाठी मोहीम
Published on
Updated on

पुणे: पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेने अंगणवाड्यातील बालकांची आधारकार्ड काढण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. यामध्ये जवळपास 3 लाख 28 हजार बालकांचे आधार कार्ड काढण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात बहुतांश बालकांची आधारकार्ड काढण्याचे उद्दिष्ट महिला व बालकल्याण विभागाने ठेवले आहे. आधारकार्ड काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी मशीन उपलब्ध करून दिले असून, आधारकार्ड काढण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे 4 हजारांपेक्षा जास्त अंगणवाड्यांत बालकांना पोषण आहार पुरविण्यात येतो. यासाठी पोषण ट्रॅकर अ‍ॅप तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये अंगणवाड्यांतील सर्व बालकांची असणार आहे. त्यामुळे बालकांना आधारकार्ड बेस आहार दिला जाणार आहे.

आधारकार्ड काढण्यासाठी जिल्ह्यात 90 पथके तयार करण्यात आली असून, या पथकांच्या मदतीने जिल्ह्यातील अंगणवाड्यांतील 3 लाख 28 हजार बालकांची आधारकार्ड तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली. अंगणवाड्यांमध्ये दाखल असलेल्या बालकांच्या पालकांनी आधारकार्ड काढण्यासाठी सहयोग द्यावा. जेणेकरून अंगणवाड्यातील सर्व बालकांची आधारकार्ड काढली जातील. आधारकार्ड नोंदणीसाठी शंभर मशीन उपलब्ध करण्यात येणार असून, जिल्ह्यातील पाच वर्षे वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची विशेष मोहीम आठवडाभर असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news