बारामतीत योग संभाषा परिषद उत्साहात यशस्वी

बारामतीत योग संभाषा परिषद उत्साहात यशस्वी
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डॉ. नीलेश महाजन यांच्या संकल्पनेतून बारामती योग महाविद्यालयातर्फे 4 व 5 जून रोजी योग संभाषा परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत बारामती, पुणे, भोर, नगर येथील 35 योग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योगशास्त्राचे खरे स्वरूप आजच्या योग विद्यार्थ्यांना कळावे व त्याद्वारे त्यांनी योगशास्त्राचा मूळ उद्देश समाजापर्यंत पोहचवावा, या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेमध्ये योगशास्त्रातील शुध्दिक्रिया, योगासने, प्राणायाम, योगतत्त्वज्ञान यांचे विविध योगतज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉ. अनिल मोकाशी आणि डॉ. माधुरी मोकाशी उपस्थित होते. डॉ. महाजन यांनी 'योगशास्त्र आणि करिअरच्या संधी' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

योगक्षेत्रात परदेशातील संधी, करिअरची सुरुवात, उच्च शिक्षणाच्या संधी, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुण्यातील प्रसिद्ध व्याख्याते सुनील बहिरट यांनी मनाची शक्ती कशी विकसित करावी, त्याला योगशास्त्राची कशी मदत होते, हे 'योगसाधनेतून परिपूर्णत्वाकडे' या विषयाद्वारे सांगितली. भालचंद्र ढेकाणे यांनी 'अय्यंगार योग' याविषयी मार्गदर्शन केले.

पुण्यातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या विभागप्रमुख सुवर्णा भापकर यांनी 'योगशिक्षणाचे जीवनातील महत्त्व' या विषयावर संवाद साधला.
योग संभाषा परिषद यशस्वी करण्यासाठी योग महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. भक्ती महाजन आणि योग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news