

पौड : चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीला पौड पोलिसांनी अटक केली. तर दोन आरोपी फरार झाले आहेत. आरोपीकडून चोरीची दुचाकी गाडी व चाकू जप्त करण्यात आला आहे. शाम राजेंद्र मोहिते (वय 19, रा. शिवराज पार्क, साईचौक, इंद्रप्रस्थ शेजारी, नवी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विशाल कटके (रा. टी. बी. कॉर्टरस नवी सांगवी रोड औंध पुणे) व बाँबी स्वामी (रा. कृष्णा चौक सांगवी पुणे) हे दोन आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सहायक फ़ौजदार संतोष कुंभार, सहायक फ़ौजदार पंढरीनाथ कामठे,पोलीस नाईक रॉकी देवकाते, जवान राजेश गायकवाड़ हे पिरंगुट बीटमध्ये रात्रगस्त करीत होते. पिरंगुट घाटात असलेल्या वनलिका सोसायटी जवळ आडोशाला आरोपी हे अंधारात उभे होते. पोलिसांनी हटकले असता तिघे पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले.यातील एका आरोपीला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार यांनी डोंगरात पाठलाग पकडले, त्याच्याकडे एक चोरी केलेली नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची स्पलेडर गाडी व चाकू मिळुन आला.