पुणेकरांची काश्मीरमध्ये फिरती रुग्णसेवा

फिरत्या रुग्णसेवेचा प्रारंभ करताना कारगिलचे जिल्हाधिकारी संतोष सचदेव, लष्कराचे अधिकारी व पुण्यातील युवक.
फिरत्या रुग्णसेवेचा प्रारंभ करताना कारगिलचे जिल्हाधिकारी संतोष सचदेव, लष्कराचे अधिकारी व पुण्यातील युवक.

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष व कारगिल विजय दिनानिमित्त पुण्यातील युवकांनी काश्मीरच्या सीमावर्ती भागात मोबाईल मेडिकल क्लिनिक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा (फिरती रुग्णसेवा) सुरू केली. कारगिलचे जिल्हाधिकारी संतोष सचदेव यांच्या हस्ते या सेवेला सुरुवात झाली. याखेरीज गुरेझ सेक्टर येथे भारतीय लष्कर व बांडीपोरा ड्रिस्ट्रिक्टच्या वतीने विशेष मोबाईल मेडिकल क्लिनिक सुरू करण्यात आली आहे.

बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. नरसिंह लगड यांनी सांगितले की, भारतीय लष्कराचे जवान तसेच स्थानिक रहिवाशांना वेळेवर अद्ययावत आरोग्य सेवा देण्यासाठी मोबाईल रुग्णसेवा सुरू केली आहे. सीमावर्ती भागातील 54 गावांत पाच वर्षे वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. या वेळी सासवड येथील हारगुडचे रवींद्र ताकवले, डॉ. महेश मुळे, डॉ. अंशू मुळे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news