पुणे : सात हजारांवर उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द; परीक्षा देण्यास कायमस्वरूपी बंदी

exam
exam

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना यापुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. आरोग्य भरती परीक्षेतील गैरप्रकारांचा पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत असताना त्या तपासातून टीईटी घोटाळा उघड झाला. यात परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, परीक्षा घेणार्‍या खासगी कंपनीचे संचालक आणि उमेदवारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. तपासादरम्यान परीक्षार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचीही कसून तपासणी करण्यात आली असता, 7 हजार 880 उमेदवारांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचे उघड झाले. निकालात अपात्र असलेल्या उमेदवारांनी गैरप्रकार करून पात्र करून घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी संबंधित उमेदवारांची यादी आणि अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार परीक्षा परिषदेने राज्य समितीत ठराव मंजूर करून उमेदवारांची यादी, कारवाईच्या आदेशाचे परिपत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. गैरप्रकार केलेल्या उमेदवारांपैकी 7 हजार 500 उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून ते अपात्र असताना त्यांना अंतिम निकालात पात्र करण्यात आले.

अंतिम निकालात अपात्र असलेल्या 293 उमेदवारांना परीक्षा परिषदेने प्रमाणपत्र वितरित केलेले नसून, त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले किंवा तसा प्रयत्न केला आहे. 87 उमेदवार आरोपीकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे निश्चित झालेले आहेत. त्यापैकी सहा उमेदवारांचा 7 हजार 500 उमेदवारांमध्ये समावेश असून, उर्वरित 81 उमेदवारांपैकी 66 उमेदवार अंतिम निकालात अपात्र आहेत आणि तीन उमेदवार परीक्षेला अनुपस्थित होते. 7 हजार 880 उमेदवारांपैकी सहा नावे दुबार असल्याने 7 हजार 874 उमेदवारांवर अंतिम कारवाई करण्यास मान्यता देण्यात आल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news