पुणे : सात प्रभागांमध्ये आता खुल्या गटाला ‘नो एन्ट्री’

पुणे : सात प्रभागांमध्ये आता खुल्या गटाला ‘नो एन्ट्री’

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या 58 प्रभागांमधील ओबीसी आरक्षणामुळे तब्बल 7 प्रभागांत सर्वसाधारण खुल्या गटासाठी एकही जागा मिळू शकलेली नाही. त्यामुळे या प्रभागात सर्वसाधारण खुल्या गटालील इच्छुकांना आता 'नो एन्ट्री' असणार आहे.

खुल्या गटासाठी जागा नसलेल्या प्रभागांमध्ये प्रभाग क्र. 3 लोहगाव-विमाननगर, प्रभाग क्र. 21 कोरेगाव पार्क-मुंढवा, प्रभाग क्र. 37 जनता वसाहत-दत्तवाडी, प्रभाग क्र. 39 मार्केट यार्ड-महर्षिनगर, प्रभाग क्र. 42 रामटेकडी-सय्यदनगर, प्रभाग क्र. 46 महंमदवाडी-उरुळी देवाची, प्रभाग क्र. 47 कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या प्रभागांचा समावेश आहे. या सर्व प्रभागांतील सर्वसाधारण गटातील पुरुष इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news