पुणे : शेळगाव येथील सुरेश बनकर आत्महत्या प्रकरणी चार जणाना अटक

file photo
file photo
Published on
Updated on

शेळगाव, पुढारी वृत्तसेवा : शेळगाव(ता.इंदापूर)येथील शिवसेना शाखा प्रमुख असलेल्या सुरेश सोपाना बनकर यांनी बुधवार(दि 10)रोजी गळफास घेऊन केलेल्या आत्महत्या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी मयत सुरेश बनकर यांच्या भावासह भावजय, पुतण्या व सुनेवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306.323.504.506.34 अनवये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सुरेश यांंचा भाऊ पोपट सोपान बनकर व भावजय केशर पोपट बनकर, पुतण्या राहुल सोपान बनकर व पुतण्याची बायको स्नेहल राहुल बनकर या चार आरोपींंना अटक केली आहे.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शेळगाव येथील घरात्या घरासमोर मंगळवारी (दि ९) यातील आरोपी फटाकड्याच्या तोफा उडवित होता. त्यावेळेस सुरेश बनकर हे तेथून घरी येत असताना त्यास तोफा का उडवतो असे विचारले असता, आरोपीनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन, 'अरे लंगड्या काय केलेस गुन्हा दाखल करून. काय झाले माझे वाकडे. मी आलो ना जामीनावर सुटून', असे म्हणत सुरेश बनकर यांना हाताने मारहाण केली.

त्यावेळी मृत सुरेश बनकर यांची पत्नी व फिर्यादी सिंधू सुरेश बनकर भांडणे सोडविण्यासाठी गेली असता दोंघानाही आरोपीनी हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी सिंधू बनकर व फिर्यादीचे पती सुरेश बनकर हे घरी आले. तेंव्हा पासून सुरेश सोपाना बनकर हे मानसीक दडपणाखाली होते. त्यातून त्यांनी बुधवार(दि.10) रोजी मारहाण व जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत सिंधू सुरेश बनकर (वय ४० रा शेळगाव,ता इंदापूर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली असून, त्यावरून आरोपी पोपट सोपाना बनकर, केशर पोपट बनकर, राहुल पोपट बनकर व स्नेहल राहुल बनकर (सर्व रा. शेळगाव माळीवस्ती ता. इंदापुर) यांच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपीना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बी एन लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विजय टेळकीकर करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news