पुणे : शिवकन्यांनी जिंकली शिवप्रेमींची मने

शिवनेरी किल्ल्यावर पोवाडा गाताना पोतले भगिनी.
शिवनेरी किल्ल्यावर पोवाडा गाताना पोतले भगिनी.
Published on
Updated on

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा : तरुणाईला लाजवेल अशा कणखर बाण्यामध्ये शिवनेरी किल्ला एका दमात चढून शिवगीते, पोवाडा खड्या आवाजात गात 65 वर्षे वयाच्या भगिनींनी शिवप्रेमींची मने जिंकली.

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मोहितेवाडीच्या पोतले परिवाराच्या सुना असलेल्या विमलबाई महादेव पोतले (वय 65) आणि यमुनाआक्का ज्ञानेश्वर पोतले (वय 60) या बहिणी पायी शिवनेरी किल्ल्यावर आल्या होत्या. शिवाईदेवीचे दर्शन घेऊन शिवजन्मस्थळावर माथा टेकवून त्यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये "बाल शिवाजीचा" शिवजन्म पोवाडा म्हटला.

या शिवकन्या तरुणाईचे आकर्षण ठरल्या. अनेकांनी त्यांच्या पोवाडा व गीतांचे व्हिडिओ काढले. 'तरुण पिढीने गड-किल्ल्यांना भेटी देऊन ऐतिहासिक वारसा जपावा तसेच किल्ल्यांचे पावित्र्य राखावे,' असे आवाहन त्यांनी केले. या वेळी शिक्षकनेते धर्मराज पवळे, माऊली गोरडे, अक्षय गोरडे, राजवेद पवळे, कल्पना रेटवडे, विजया पवळे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news