पुणे : शिंदेवाडी-एकलहरे येथे बिबट्याचे दर्शन

शिंदेवाडी- एकलहरे येथे नागरिकांना दिसलेला बिबट्या.
शिंदेवाडी- एकलहरे येथे नागरिकांना दिसलेला बिबट्या.

मंचर, पुढारी वृत्तसेवा : शिंदेवाडी- एकलहरे (ता. आंबेगाव) येथे गेले दोन दिवस नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने अनेक कुत्री व कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे.

"मंचरच्या उत्तर बाजूला तीन किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी आहे. जवळच डोंगर व ऊस पीक आहे. बिबट्याचा वावर या भागातील नागरिकांनी पहिला आहे. गेल्या 15 दिवसांपासून येथे बिबट्याचा वावर आहे. मानवी वस्तीत बिबट्या आला आहे. येथे राहणारे अनेक कामगारांना घरी यायला रात्र होते. तसेच शेतकर्‍यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. मात्र भीतीपोटी पिकांना पाणी देण्याच्या कामावर परिणाम झाला आहे. कामगारांना जीव मुठीत धरूनच घरी यावे लागते," असे शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.

बिबट्या मादी असून पूर्ण वाढ झालेली आहे. तिच्यासोबत दोन बछडेदेखील आहेत. वन खात्याकडून पिंजरा लावण्याची अनेकदा मागणी केली आहे. परंतु, वन खात्याकडून पिंजरा लावण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार शेतकरी बाळासाहेब शिंदे, प्रदीप शिंदे, मारोतराव शिंदे यांनी केली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी वन खात्याने पिंजरा लावावा; अन्यथा आंदोलन करावे लागेल,"असा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news