पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार राज्यात बीए 4 व्हेरियंटचे 2, बीए 5 व्हेरियंटचे 6 तर बीए 2.75 चे 3 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण पुण्यातील असल्याचे आरोग्य विभागातर्फे कळवण्यात आले आहे.
31 मे ते 5 जुलै 2022 या कालावधीत पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यातील तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत आढळलेल्या बीए 4 आणि बीए 5 या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 79 तर बी ए. 2.75 या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 32 झाली आहे. तिन्ही व्हेरियंटचा संसर्ग संसर्ग सौम्य स्वरूपाचा असल्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.