पुणे शहराच्या पूर्व भागाचा रविवारी पाणीपुरवठा बंद

पुणे शहराच्या पूर्व भागाचा रविवारी पाणीपुरवठा बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती कामांमुळे या अखत्यारीत येणार्‍या भागांचा पाणीपुरवठा रविवारी (दिनांक 11 सप्टेंबर) बंद राहणार आहे. तसेच, सोमवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा परिसर :-
भामा असखेड जलशुद्धीकरण केंद्र परिसर : लोहगाव, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगर, फुलेनगर, येरवडा या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, सोमवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news