पुणे : व्यावसायिक तरुणाची गोळी झाडून आत्महत्या

www.pudhari.news
www.pudhari.news

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कौटुंबिक कलहातून हडपसर भागातील व्यावसायिक तरुणाने राहत्या घरात पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशाल राजेंद्र तोडकर (रा. भागीरथीनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल व्यावसायिक होता. त्याची कपड्याची तीन दुकाने होती.

तो पत्नी आणि आईसोबत राहत होता. तीन महिन्यांपासून त्याची पत्नीही माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो नैराश्यात होता, तर घरीदेखील एकटा राहत होता. या नैराश्यातून रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. विशालकडे गावठी पिस्तूल कोठून आले, याबाबत त्याच्या कुटुंबाकडे व मित्रांकडे विचारपूस केली जात आहे; परंतु त्याबाबत कोणालाच माहिती नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news