पुणे : विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा

पुणे : विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा
Published on
Updated on

जुन्नर, पुढारी वृत्तसेवा : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव साजरा करावा. शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांकडून सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार असून, दारू विक्रीला पोलिसांच्या विशेष पथकाकडून पायबंद घातला जाणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले.

जुन्नर पोलिस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार अतुल बेनके, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, मुख्याधिकारी मनोज पष्टे, माजी नगराध्यक्ष शाम पांडे आदींसह नगरसेवक, पोलिस पाटील, गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कालावधीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. समाजाला दिशा देणारे देखावे आणि सामाजिक उपक्रम मंडळांनी सादर करावेत. तालुक्याच्या विविध भागात अवैध धंदे करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार बेनके यांनी केली. रवींद्र सबनीस म्हणाले, "उत्सवाचे पावित्र्य, मांगल्य राखून, देशभक्तीपर, विधायक उपक्रम गणपती मंडळांनी राबवावेत. निवडणूक ओळखपत्र आधार कार्डाशी लिंक करण्याचा उपक्रम गणेश मंडळांनी राबवावा. त्याला महसूल विभाग सहकार्य करेल.

विसर्जन घाटांची दुरुस्ती करण्यात यावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा. जड वाहने शहराबाहेर पार्क करावीत. विसर्जन मिरवणुकीत चौदा सार्वजनिक गणेश मंडळांना एकसारखा वेळ मिळावा. कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत. गणपती उत्सवात दारू दुकाने बंद ठेवण्यात यावीत. सातव्या, नवव्या दिवशी विसर्जन होणार्‍या मंडळांना पोलिसांकडून बक्षिसे देण्यात यावीत. शहरात खासगी ठिकाणी होणार्‍या जनावरांच्या कत्तली तसेच चोरून होणारी मांस वाहतूक बंद करण्यात यावी, आदी मागण्या गणेश मंडळांचे पदाधिकारी प्रफुल्ल बोर्‍हाडे, शाम खोत, संदेश बारवे, श्रीकांत जाधव, सुनील काळे, दीपक छाजेड, रउफ खान, अर्षद शेख आदींनी केली. पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी स्वागत केले. विलास कडलक यांनी सूत्रसंचालन केले. अमोल पाटील यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news