पुणे : वाखारीत पालखी सोहळ्याचे स्वागत

वाखारी येथे पालखी सोहळ्याचे स्वागत करताना चव्हाण व इतर मान्यवर.
वाखारी येथे पालखी सोहळ्याचे स्वागत करताना चव्हाण व इतर मान्यवर.
Published on
Updated on

यवत, पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या वाटेवर वाखारी (ता. दौंड) येथे ग्रामस्थांनी स्वागत केले. बुधवारी (दि. 20) सकाळी वरवंड येथील मुक्काम उरकून पालखी सोहळा देहूकडे मार्गस्थ होत असताना वाखारी वाकडा पूल येथील बाळासाहेब चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करत पादुकांचे पूजन केले.

या वेळी वारकरी व ग्रामस्थांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. पालखीमधील पादुका पूजन झाल्यानंतर पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी उरुळी कांचनसाठी मार्गस्थ झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news