पुणे : मोरगाव-निरा रस्त्यावरील चौधरवाडी घाट धोकादायक

पुणे : मोरगाव-निरा रस्त्यावरील चौधरवाडी घाट धोकादायक

मोरगाव, पुढारी वृत्तसेवा : मोरगाव-निरा या 24 किमी लांबीच्या बारामती तालुक्याच्या पश्चिम सीमेवरून जाणार्‍या रस्त्यावरील चौधरवाडी घाट मृत्यूचा सापळा बनला आहे.

मोरगाव-निरा रस्त्यातील वन खात्याच्या हद्दीतील चौधरवाडी घाट तीव्र उतार व चढणीचा, वेड्यावाकड्या वळणाचा आहे. घाटातील रस्ता कमी रुंदीचा आहे. या घाटाच्या उत्तरेकडे दरी व दक्षिणेच्या बाजूला घाटाची डोंगर भिंत, यामुळे हा रस्ता कमी रुंदीचा झाला आहे. या ठिकाणी अवजड वाहने कासव गतीने चालतात. वाहने मागे सरकू नयेत, यासाठी उट्या लावाव्या लागतात. या घाटात वारंवार अपघात होतात. काही वर्षांपूर्वी अवजड वाहनातील चालकास उपचारात दिरंगाई झाल्याने प्राण गमवावे लागले होते.

दर दोन दिवसाला या घाटात वाहने दरीत घसरतात किंवा डोंगर भिंतीवर आदळून आडवी पडतात. मालाचे, वाहनांचे नुकसान होते. या रस्त्यावरील घाटात वाहनांची गती कमी झाल्याने अवजड वाहनांतील साहित्याच्या चोर्‍या होतात. घाटातील रस्त्याची रुंदी वाढविणे आवश्यक आहे.

बारामती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम खात्याने रुंदीकरणाचा प्रस्ताव सादर केल्यास वन खाते रस्तारुंदीकरणास मान्यता देते. बारामती तालुका शाखा अभियंता रामसेवक मुकेकर यांच्याशी संपर्क साधला असता, 'वन खाते परवानगी देत नाही,' असे त्यांनी सांगितले. याबाबत बारामती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता, 'वनखात्याला रुंदी वाढविण्याचा प्रस्ताव दिल्यास परवानगी दिली जाते,' असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news