पुणे: तब्बल 75 मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत अटक होऊन जामिनावर सुटल्यानंतर सराईत चोरट्याने पुन्हा मोबाईल चोरी केल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने उघडकीस आणला आहे. त्याच्याकडून महागडे 9 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अनिल अरुण बोबडे (वय 29, रा. सिनेगॉग स्ट्रीट, इमामवाड्यासमोर, फुटपाथवर, कॅम्प, पुणे) असे त्याचे नाव आहे.