पुणे : महिलेचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरी

पुणे : महिलेचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरी

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती येथील जिल्हा न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी शेळगाव (ता. इंदापूर) येथील लक्ष्मण रामचंद्र लकडे यास महिलेचा विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अत्याचारप्रकरणी 3 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

आरोपीने 1 मे 2018 रोजी पीडितेचा विनयभंग केला व जातीवाचक शब्द उच्चारले. त्याबाबत वालचंदनगर पोलिस स्टेशनमध्ये पीडितेने त्याच्याविरुध्द फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यात फिर्यादी सरकार पक्षातर्फे पीडिता, इतर 5 साक्षीदार व तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदवली.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील डी. एस. शिंगाडे यांनी काम पाहिले. पीडितेची साक्ष व विशेष सरकारी वकील डी. एस. शिंगाडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा सुनावली. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी तपासी अधिकारी म्हणून काम पाहिले. वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. लातुरे, पोलिस उपनिरीक्षक एन. ए. नलवडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. एस. जगताप यांनी तपासकामी सहकार्य केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news