पुणे : मंचर नजिक पुलाच्या कठड्याला एसटीची धडक

पुणे : मंचर नजिक पुलाच्या कठड्याला एसटीची धडक

मंचर : पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून नवापूरकडे जाणारी एसटी बसचा डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाल्यामुळे कळंब (ता. आंबेगाव) येथे घोड नदीच्या पुलाच्या डाव्या बाजूच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

पुणे ते नवापूर एसटी (एमएच 40 एन 9616) ही पुण्यावरून मंचर मार्गे नारायणगावच्या दिशेने जात असताना पुढील बाजूचा टायर कळंबगावानजीक पंक्चर झाला. त्यामुळे एसटी बस कठड्याला जाऊन धडकली. घटनेची माहिती कळंब ग्रामस्थांनी मंचर पोलिस ठाण्याला कळविल्यानंतर घटनास्थळी मंचर पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि कळंबच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बस काढण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवून दुसर्‍या बसमध्ये बसवून दिले. अपघातामुळे पुणे- नाशिक महामार्गावर जवळपास दोन ते तीन तास वाहतूक खोळंबली होती.

कळंबचा पूल अरुंद असल्याने कळंबच्या पुलावर अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी हा विषय कळंबकरांसाठी नित्यनेमाचा झाला आहे. नवीन बाह्यवळण रस्त्याचे आणि सर्व्हिस रोडचे काम अजून प्रलंबित असल्याने तसेच पुलाचे कामही अजून पूर्ण झाले नसल्याने जुना पुणे- नाशिक महामार्गावर अपघात झाल्यास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. नवीन रस्त्याचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होऊन रस्ता चालू होणार होता, परंतु अद्यापही सुरू झालेला नाही. नवीन महामार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी कळंब ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news