पुणे : भोसरी येथे धारधार शस्त्राने वार करून महिलेचा खून

सातारा
सातारा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पतीच्या निधनानंतर लहान मुलाला घेऊन भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. आरोपीने महिलेवर धारधार शस्त्राने वार केले आहेत. ही घटना शनिवारी (दि. २५) रात्री सव्वा नऊच्या सुमारास धावडेवस्ती, भोसरी येथे उघडकीस आली. कलावती धोंडीबा सुरवार (३८, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कलावती यांच्या पतीचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पासून त्या मुलासह धावडेवस्ती येथे राहत होत्या. दरम्यान, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात इसमाने घरात घुसून धारदार शस्त्राने वार करीत त्यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दहा दिवसांत आठ खून

पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून खूनाची मालिका सुरू आहे. दहा दिवसात आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण आठ खून झाले आहेत. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news