पुणे : भुलेश्वरमध्ये वन विभागाच्या कमानीबाहेर वाहने रोखणार

श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे पार पडलेल्या बैठकीस उपस्थित असलेले मान्यवर.
श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे पार पडलेल्या बैठकीस उपस्थित असलेले मान्यवर.
Published on
Updated on

माळशिरस, पुढारी वृत्तसेवा : येथील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र भुलेश्वर श्रावण यात्रा नियोजनाबाबत बैठक झाली. बैठकीत श्री भुलेश्वराच्या दर्शनासाठी होणारी गर्दी योग्य तर्‍हेने हाताळण्यासाठी वन विभागाच्या कमानीबाहेरच वाहने रोखण्याचा निर्णय झाला.

श्री क्षेत्र भुलेश्वरला श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते. श्रावणातील चारही सोमवारी श्रीभुलेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी असतेे. गर्दी पाहता यात्रा सुरळीत पार पडावी म्हणुन यात्रेपूर्वी नियोजनाची बैठक घेण्यात आली. बैठकीत मंदिराजवळ गर्दी कमी करण्यासाठी वनविभागाच्या कमानीबाहेर वाहने थांबवण्याचा निर्णय झाला. मंदिराभोवती दर्शन रांगही तयार केली आहे. वीज, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासनांत याबाबत चर्चा झाली. भुलेश्वर घाटरस्त्यावर आलेली झाडे कमी करण्याच्या सूचना दिल्या. देवस्थानकडे येणारा रस्ता खराब झाल्याने तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या. रविवार व सोमवार दोन दिवस पोलिस बंदोबस्त वाढविणार आहे तसेच अन्यही विषयांवर चर्चा झाली.

वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, विस्ताराधिकारी कांबळे, राजेवाडी मंडलाधिकारी भारत भिसे, जेजुरी पोलिस स्टेशनचे माळशिरस बीट अंमलदार सोमनाथ चितारे, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी स्मिता बिर्‍हाडे, देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव, माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके आदींसह पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

केंद्रीय पुरातत्व विभागाचीच बैठकीला दांडी

दरवर्षी यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होत असते. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा व्यवस्थित पार पडावी, या उद्देशाने ही बैठक बोलावली होती. बैठकीत सर्वच विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. मात्र, याच विभागाने बैठकीला दांडी मारली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news