पुणे : बाराशे अंगणवाड्यांना वीजजोड

पुणे : बाराशे अंगणवाड्यांना वीजजोड
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात स्वतंत्र इमारती असलेल्या अंगणवाड्यांना वीजजोड देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत एक हजार 181 अंगणवाड्यांना वीजजोड देण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींना दहा टक्के सेसनिधीतून प्रत्येकी 3 हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वीज जोडणीसाठी ग्रामपंचायतींना 3 हजार रुपये देण्यात आले असून, त्याबाबत महावितरणच्या कार्यालयांना पत्र देण्यात आले असून, त्यांच्याकडून ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत ही सर्व वीज जोडणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन वीज जोडणीसाठी 1 हजार 250 रुपये खर्च असून, उर्वरित रक्कम वायरिंग, पाईंटर, फिटिंगसाठी उपलब्ध असतील, असेही गिरासे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास योजना, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी राबवली जाते. या योजनेतून अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news