पुणे : बाप्पाचे थाटात आगमन; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. त्यात  मंडळाचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन सहभागी झाले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. त्यात मंडळाचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन सहभागी झाले.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'गणपती बाप्पा मोरया',"मंगलमूर्ती मोरया'च्या गजरात, सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल-ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद आणि पारंपरिक रथ अशा उत्साही आणि मंगलमय वातावरणात भारतातील पहिल्या सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे आगमन झाले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी मंडळाचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, जान्हवी धारिवाल-बालन, भाजप संघटक सरचिटणीस राजेश पांडे, संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, '1892 पासूनची जुनी परंपरा असणारा, भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असणार्‍या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आनंद होत आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळात मंडळाने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.' सकाळी सव्वानऊ वाजता बाप्पांची मिरवणूक मंडपातून सुरू होऊन श्री तांबडी जोगेश्वरी चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे पुन्हा उत्सव मंडपात आली.

या मिरवणुकीतील रथाचे सारथ्य पाटील यांच्यासह बालन दापंत्याने केले. यावेळी श्रीराम, कलावंत, चेतक, वाद्यवृंद, अभेद्य, समर्थ, जगदंब या ढोल-ताशा पथकांबरोबरच नगारा, सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात, रथातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

कोरोनाचे विघ्न दूर झाल्याने तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा त्याच जल्लोषात गणेशोत्सव साजरा करता येतोय, याचा मनस्वी आनंद आहे. त्यामुळे हा गणेशोत्सव सर्वच गणेशभक्तांसाठी सर्वार्थाने वेगळा आणि सामाजिक दायित्वाची जाणीव अधिक दृढ करणारा असणार आहे.
पुनीत बालन, विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news