पुणे : बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे : बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपी ई-बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आळंदी रस्त्यावरील आर्मी पब्लिक स्कूलसमोर घडली. या प्रकरणी पीएमपी बसचालकाच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महेश हरिभाऊ पाटोळे (रा. साई तिरुपती ग्रीन सोसायटी, वडमुखवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत सचिन रायनातलू (रा. वडमुखवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी खात्यात लिपिक असलेले दुचाकीस्वार पाटोळे आळंदी रस्त्याने जात होते. आर्मी पब्लिक स्कूलसमोर भरधाव पीएमपी बसने दुचाकीस्वार पाटोळे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाटोळे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी पीएमपी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक शरद माळी तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news