पुणे : बकरीमुळे त्रास होत असल्याचा वाद थेट पोलिस ठाण्यात!

पुणे : बकरीमुळे त्रास होत असल्याचा वाद थेट पोलिस ठाण्यात!

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पोपट शिट्या मारतो, त्याचा त्रास होतो म्हणून आजोबांनी पोलिस ठाणे गाठले होते. पुण्यात हे काय कमी होते की काय म्हणून, आता बकरी दारात बांधल्याचा व तिच्या आवाजाचा त्रास होत असल्याचा जाब एकाने विचारला. मग काय बकरी मालकाने त्याला मारहाण केली आणि हा वाद थेट खडकी पोलिस ठाण्यात पोहोचला.

याबाबत एका शिवाजीनगर येथील महात्मा गांधी वसाहतीत राहणार्‍या एका 35 वर्षीय युवकाने खडकी पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुला विरूध्द तक्रार दिली आहे. त्यावरून संबधीत अल्पवयीन मुलाविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

फिर्यादी व अल्पवयीन मुलगा शेजारी शेजारी राहण्यास आहेत. संशयीत अल्पवयीन हा त्याची बकरी फिर्यादीच्या दारात बांधत असल्याने तिच्या आवाजाचा आणि तिच्या लेड्यांचा कचरा फिर्यादीच्या दारात होत असल्याने त्यांनी त्या मुलला बकरी आमच्या दारात का बांधली असा जाब विचारला होता. याच वादातून दोघांमध्ये बाचाबाच झाली. त्यातून चिडून जाऊन त्या मुलाने फिर्यादीला मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

हा सर्व झालेल्या प्रकार फिर्यादीला सहन न झाल्याने त्यांनी शेवटी पोलिस ठाणे गाठून पोलिसांसमोर आपले गार्‍हाणे मांडले. पोलिसांनी संबधीत मुलाला पोलिस ठाण्यात बोलवून घेत समज दिली. तसेच पुन्हा शेजारी फिर्यादीला त्रास न व्हावा यासाठी फिर्यादीच्या दारात बकरी न बांधण्याचा देखील सल्ला दिला. याप्रकरणात संबधीत मुलाला 149 ची नोटीस देण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news