पुणे : प्रलंबित प्रकरणे महसूल दिनाच्या आधी निकाली काढणार

पुणे : प्रलंबित प्रकरणे महसूल दिनाच्या आधी निकाली काढणार
Published on
Updated on

लोणी काळभोर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या 'माझे कार्यालय सुंदर कार्यालय' या मोहिमेंतर्गत हवेली तहसील कार्यालयात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून एक विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने येत्या महसूल दिनाच्या अगोदर ही प्रकरणे निकाली निघतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली.

यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेत सर्व संकलकांनी त्यांच्याकडील एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित प्रकरणांची विगतवारी तयार करून व ही प्रकरणे तत्काळ निर्गत करावीत. प्रतिदिन प्रकरणाची मंडलाधिकारीनिहाय यादी तयार करून तीन महिन्यांहून अधिक प्रलंबित प्रकरणाची यादी मंडलाधिकारी यांच्याकडून घेऊन त्याची निर्गती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दररोज सकाळी 9.44 ते 2.30 या कालावधीत अभ्यागतांना संकलन लिपिकास भेटण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारनंतर आलेल्या अभ्यागतांना संकलन लिपिकास भेटता येणार नाही, तर त्यासाठी संकलन रजिस्टर तयार करण्यात आले आहे. यात त्यांच्या प्रकरणाची नोंद घेतली जाईल. सर्वसामान्य नागरिकांना आपली कामे वेळेत व्हावीत, यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news