पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान’बाबत निर्णय

पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान’बाबत निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवण्यात येत आहे. लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करणे, गावपातळीवरील शासकीय कर्मचार्‍यांनी लाभार्थ्यांशी संपर्क करणे तसेच विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार असून, ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, तलाठी कार्यालय, विकास संस्था, बँक, पतसंस्था यांच्या नोटीस फलकावरही लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दवंडी देऊनही याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. ई-केवायसीसाठी आता 31 पर्यंत मुदतवाढ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news