पुणे : तुटवड्यामुळे कांदेपोहे आणि तुरडाळीची दरवाढ सुरूच असून, गेल्या आठवड्यातही दरात मोठी वाढ झाली. तुरडाळ क्विंटलमागे आणखी 500 ते 700 रुपयांनी, तर सर्व प्रकारचे पोहे क्विंटलमागे 100 ते 50 रुपयांनी महागले. मागणी वाढल्यामुळे साखरेच्या दरात क्विंटलमागे आणखी 50 रुपयांनी तर रवा आणि मैद्याच्या दरात 50 किलोमागे 50 ते 75 वाढ झाली. आवक-जावक साधारण असल्यामुळे सर्व खाद्यतेलांचे दर स्थिर होते.
चालू महिन्यात अनेक सण-उत्सव असल्यामुळे साखरेची मागणी वाढली आहे. मात्र चालू महिन्यासाठी देण्यात आलेला कोटा अपुरा असल्यामुळे तुटवडा निर्माण होऊन दरवाढ सुरु झाली आहे. गेल्या आठवडयातही साखर दरात क्विंटलमागे आणखी 50 रुपयांनी वाढ झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3600 ते 3650 रुपये होता. सणासुदीचा मोसम असल्यामुळे गुळास मागणी वाढली असून दरात क्विंटलमागे 50 ते 100 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
तुरडाळ, मटकी दरात आणखी वाढ
तुटवड्यामुळे उत्पादन केंद्रात तुरडाळीचे दर सातत्याने वाढत आहेत. परिणामी, येथील बाजारातही तुरडाळीच्या दरात सातत्याने दरवाढ होत आहे. गेल्या आठवडयातही दरात क्विंटलमागे 500 ते 700 रुपयांनी वाढ झाली. आवक कमी असल्यामुळे सर्व प्रकारच्या मटकीचे दरही तेजीत आहेत. गेल्या आठवडयातही गावरान, पॉलीश तसेच सेलम मटकी दरात क्विंटलमागे आणखी 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली. मागणीअभावी अन्य सर्व डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर होते.
पोह्यांचे दर विक्रमी पातळीवर
ऐन सणासुदीच्या तोंडावरच भाताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून भाव अक्षरशः गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्व प्रकारच्या पोहया्ंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडयातही कांदा पोहा, दगडी पोहा तसेच पातळ पोहया्ंच्या दरात क्विंटलमागे आणखी 100 ते 150 रुपयांनी वाढले. पोहयाचे सध्याचे दर विक्रमी असून भाताचा पुरवठा न वाढल्यास ही दरवाढ अशीच चालू राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर : (प्रतिक्विंटल) 3600-3650 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2750-2800, रिफाईंड तेलः 2500-3100, सरकी तेल 2200-2600, सोयाबीन तेल 1950-2150, पामतेल 1850-2100, सूर्यफूल रिफाईंड तेल 2400-2600, वनस्पती तूप 1650-2450, खोबरेल तेल 2250 रु.
तांदूळ : गुजरात उकडा 3500-3800, मसुरी 3300-3500, सोनामसूरी 4000-4300, एच.एम.टी. कोलम 4700-5000, लचकारी कोलम 5000-5500, चिन्नोर 4000-4500, 1121-1000-10500, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11000-12000, बासमती दुबार 8000-9000, बासमती तिबार 9000-10000, बासमती मोगरा 5000-5500, बासमती कणी 3000-3500, 1509-7500-8500 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3500-3800, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3200-3400, एम.पी. लोकवन 2900-3600, सिहोर नं. 1 4800-5500, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3200-3600, मिलबर 2750-2800 रु.
ज्वारी : गावरान नं. 1-4200-4500, गावरान नं. 2-3400-3800, नं. 3 3000-3200, दूरी 3200-3200 बाजरी : महिको 3000-3200, गावरान 2700-2800, हायब्रीड 2600 रु.
गूळ : गूळ एकस्ट्रा 3800-4000, गूळ नं.1 3550-3650, गूळ नं.2 3350-3500, गूळ नं.3 3200-3300, बॉक्स पॅकिंग 3500-4800 रु. डाळी : तूरडाळ 11000-11500, हरभराडाळ 6000-6200, मूगडाळ 8500-8700, मसूरडाळ 8500-8600, मटकीडाळ 11500-11800, उडीदडाळ 9000-11000 रु.
कडधान्ये : हरभरा 5500-5600, हुलगा- 6500-7000 चवळी 7500, चवळी भारी 8000 मसूर 7800-8000, मूग 7700-8500, मटकी गावरान 12500, मटकी पॉलिश 9700-10000, मटकी गुजरात 9700-10000, मटकी राजस्थान 9700-10000, मटकी सेलम 13500-14000, वाटाणा हिरवा 5000-5500, वाटाणा पांढरा 6500-6700, काबुली चणा 9000-11000 रु. साबुदाणा : साबुदाणा नं.1 5500, साबुदाणा नं.2 5200, साबुदाणा नं.3 5000 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1650-1850 रु.
शेंगदाणा : जाडा 10500-11000, स्पॅनिश – 11000, घुंगरु 10500-11000, टीजे 9100 रु. धने : गावरान 12000-13000, इंदूर 14000-17000 रु. मका लाल : 2450-2550, पिवळा 2475-2525, पांढरा 2700-2900 रु. पोहे : मध्य प्रदेश 3800-4100, पेण 3700-3900, मध्यम पोहा-3700-3900, दगडी पोहा 3400-3900, पातळ पोहा 4200-400, सुपर पोहा 4100-4400, भाजका पोहा 525-575, मका पोहा 625-675, भाजके डाळे 3300-3500, मुरमुरा (9 किलोस) 440-450, भडंग 700-775, घोटी 430, सुरती 440 रु. रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1450-1525, रवा 1600-1650, मैदा 1600-1650 रु. बेसन : (50 किलोस) 3400-3700 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु.
मिरची : काश्मीरी ढब्बी 45000-47000, ब्याडगी 35000-37000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 5500-6000, खुडवा ब्याडगी 4000- 4500 रु. नारळ : (शेकडयाचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1350-1400, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1500-1550, सापसोल 2000-2700 रु.