पुणे : पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रकरणाची चौकशी करा; सत्र न्यायालयाचे आदेश

पुणे : पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रकरणाची चौकशी करा; सत्र न्यायालयाचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आंबील ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे विकसक व संबंधितांविरोधात अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारा खासगी अर्ज शिवाजीनगर सत्र न्यायालयात करण्यात आला. त्यावर संबंधित संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी दत्तवाडी पोलिसांना दिले आहेत. केदार असोसिएट्सचे सूर्यकांत निकम, प्रताप निकम व सहकारी दिलीप देशमुख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी तक्रार करण्यात आली आहे. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते किशोर मनोहर कांबळे यांनी ही खासगी तक्रार केली आहे.

त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. याप्रकरणात, याचिकाकत्र्यांच्या वतीने अ‍ॅड. अंबादास बनसोडे व अ‍ॅड. आकाश साबळे काम पाहत आहेत. कांबळे हे गेल्या वर्षभरापासून आंबील ओढा सरळीकरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय आणि दिल्ली सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहेत. आंबील ओढा झोपडपट्टीचे विकसक केदार असोसिएट्सचे सहकारी देशमुख यांनी किशोर कांबळे यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दत्तवाडी पोलिस ठाण्यात केल्या होत्या.

त्या विरोधात कांबळे यांनी 27 डिसेंबर 2021 रोजी दत्तवाडी पोलिस ठाणे आणि पुणे पोलिस आयुक्त दोन्हीकडे दिलीप देशमुख व बिल्डर केदार असोसिएट्सचे निकम पिता-पुत्र यांच्या तक्रारी करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता किशोर कांबळे यांचे अर्ज दप्तरी दाखल केला. त्यामुळे कांबळे यांनी न्यायालयात धाव घेत खासगी तक्रार दाखल केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news