पुणे : पावसाळ्यात घरीच राखा फिटनेस; तज्ज्ञांचे आवाहन

पुणे : पावसाळ्यात घरीच राखा फिटनेस; तज्ज्ञांचे आवाहन
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शारीरिकदृष्टया निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करण्याकडे अनेक आबालवृध्दांचा कल असतो. त्यातही नियमितपणे 'मॉर्निंग वॉक'ला जाणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, पावसाळयात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणे जिकिरीचे आणि जोखमीचे असते. अशा परिस्थितीत घरच्या घरी सूर्यनमस्कार, जिने चढ-उतार करणे, आपापल्या क्षमतेप्रमाणे व्यायामाचे प्रकार निवडणे यातून 'फिटनेस' राखता येऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

चालण्याचा व्यायाम हा उत्तम व्यायाम मानला जातो. कोणत्याही वयोगटातील नागरिक, अगदी ज्येष्ठ नागरिकही चालण्याचा व्यायाम करून फिटनेस राखू शकतात. आजकाल शहरातील अनेक बागांमध्ये 'जॉगिंग' आणि 'वॉकिंग' ट्रॅकही असतात. मात्र, पावसाळयाच्या दिवसांमध्ये निसरडे झालेले रस्ते, चिखल, खड्डे यामुळे चालायला जाणे जोखमीचे असते. जिमला जाणे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. अशा वेळी आता व्यायामात खंड पडण्याची भीती असते. मात्र, घरच्या घरी व्यायाम करूनही शारीरिक तंदुरुस्ती सांभाळता येऊ शकते, असे मत फिटनेसतज्ज्ञांनी वर्तवले आहे.

कोणते व्यायाम कराल?
खांदे आणि मानेचे व्यायाम
उड्या मारणे
बर्पी जम्प
वेगाने जिने चढ-उतार करणे
झुंबा
सूर्यनमस्कार

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्यायामासाठी बाहेर पडणे अवघड असते. अशा वेळी वयोगटाप्रमाणे घरच्या घरी योगासने, सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, जिने चढ-उतार करणे, घरच्या घरी पुशअप्स असे व्यायाम प्रकार करता येतात. ढगाळ वातावरणात मुख्यत: सांध्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सांध्यांचे व्यायाम करणे आवश्यक असते. श्वसनाच्या दृष्टीने प्राणायामवरही भर देता येतो.

                                             – दीप्ती आंबेकर, फिटनेस एक्स्पर्ट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news