पुणे : पहिल्याच यादीत टफ फाईट; साडेसहा हजारांहून अधिक विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढचे

पुणे : पहिल्याच यादीत टफ फाईट; साडेसहा हजारांहून अधिक विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढचे
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सीबीएसई आणि आयसीएसईच्या मंडळाच्या 95 आणि 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी तसेच राज्य मंडळाच्या नव्वद टक्क्यांहून अधिक गुण असलेले विद्यार्थी यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. 95 ते 100 टक्के गुण मिळवणार्‍या सुमारे 6 हजार 500 हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज अकरावीच्या प्रवेशासाठी आले आहेत. पहिल्या यादीत नामवंत महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात कटऑफ वाढून कांटें की टक्कर होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची नोंदणी सध्या बंद असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला भाग भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देण्यात येणारा भाग 2 भरून देण्याची मुदत शनिवारपर्यंत होती. आता सर्वसाधारण यादी पुन्हा संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहे.

3 ऑगस्ट रोजी ज्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पसंतीक्रम भरून अंतिम केले आहेत, अशा विद्यार्थ्यांना पहिल्या यादीतून प्रवेश कर्न्फम केले जाणार आहेत. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांबरोबर आयसीएसई आणि सीबीएसई विद्यार्थ्यांनाही यावर्षी 90 टक्क्यांहून अधिक गुण आहेत. यामुळे या यादीत मोठी चुरस होण्याची शक्यता महाविद्यालयांचे प्राचार्य व्यक्त करत आहेत. 95 ते 100 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे 6 हजार 500च्या आसपास अर्ज आहेत. त्याबरोबर 75 ते 95 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. यंदा गुणवंतांची संख्या जास्त असल्याने बहुतांश गुणवंत विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम निवडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या यादीत कट ऑफ वाढून 95 ते 99 पर्यंत जाईल, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सांगितले आहे.

प्रवेश निश्चिती 6 ऑगस्टपर्यंत…
पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. जर, मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, तर ते पुढील फेरीची वाट पाहू शकणार आहेत. मात्र, ज्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय मिळालेले आहे त्यांनी तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार आहे. यामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेशासाठी धडपड करावी लागणार आहे. जर पालकांनी पसंतीक्रम देताना गुण आणि महाविद्यालयातील कटऑफ याचा ताळमेळ बसवला असल्यास पहिल्या यादीत प्रवेश मिळतील.

अकरावी प्रवेशासाठी अर्जांची सद्यस्थिती
एकूण महाविद्यालये 317
एकूण जागा 112030
अर्ज नोंदणी 100951
अंतिम नोंदणी 84851
पसंती क्रम भरलेले –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news