पुणे : पहिल्या दिवशी 2828 जणांना बूस्टर

पुणे : पहिल्या दिवशी 2828 जणांना बूस्टर

पुणे : 'केंद्र सरकारच्या सूचनांनुसार 15 जुलैपासून शहरातील 68 लसीकरण केंद्रांवर 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 2828 लाभार्थ्यांनी बूस्टर डोसचा लाभ घेतला. दुसरा डोस घेऊन 6 महिने किंवा
26 आठवडे पूर्ण झालेल्या नागरिकांनी बूस्टर डोसला प्राधान्य द्यावे,' असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला.

त्यानंतर सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर 60 वर्षे वयापुढील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली. 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना खासगी केंद्रांवर 385 रुपये शुल्क भरून बूस्टर डोस घ्यावा लागत होता. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस आता 18 वर्षांपुढील सर्वच नागरिकांना मोफत बूस्टर डोस मिळणार आहे.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी शहरातील 68 लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. सोमवारपासून 200 डोस दिले जाणार आहेत. 50 टक्के लाभार्थ्यांना ऑनलाइन बुकिंग करून, तर 50 टक्के लाभार्थ्यांना प्रत्यक्ष केंद्रांवर लस मिळणार आहे. लसीकरण 10 ते 5 या वेळेत सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी काही केंद्रांवरील सर्व डोस संपलेले होते, तर काही केंद्रांवर फारसे नागरिक फिरकले नाहीत.

किती जणांनी घेतला बूस्टर डोस?
18 ते 45 वर्षे : 91,492
45 ते 59 वर्षे : 52,998
60 वर्षांपुढील : 1,65,421
बूस्टर घेतलेले एकूण
नागरिक : 3,66,810

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news