पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवी खडकी परिसरात चार जणांच्या टोळक्याने तरुणावर खुनी हल्ला केल्याचा प्रकार घडला.
टोळक्याने हवेत कोयते फिरवून परिसरात दहशतदेखील माजवली.
दरम्यान, हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अंश पुंडे त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वरूप जिरगे (वय 22) याने तक्रार दिली आहे.