पुणे : दुचाकी चोरणारा चोवीस तासांत जेरबंद

पुणे : दुचाकी चोरणारा चोवीस तासांत जेरबंद
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिका भवन परिसरात लावलेली दुचाकी चोरून पसार झालेल्या आरोपीला अवघ्या चोवीस तासांत शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. ढेंगळे पुलावरून गाडी ढकलून नेत असतानाच त्याला ताब्यात घेतले. आमीरअली वाहबअली शेख (रा. पश्चिम बंगाल) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिवाजीगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांचे पथक गस्तीवर असताना एकजण संशयीतरित्या ढेंगळे पुलावरून दुचाकी ढकलत घेऊन जात असल्याची माहिती हवालदार रणजित फडतरे, बशीर सय्यद यांना मिळाली होती. यानुसार सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने महापालिका भवन परिसरात लावण्यात आलेल्या अंडा भुर्जीच्या हातगाडीशेजारून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरिंवद माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news