पुणे : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज

पुणे : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, तसेच बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 2) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट आणि बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्टदरम्यान झाली. परीक्षेचा निकाल ुुु.ारहीर्शीीश्रीं.पळल.ळप या संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. तसेच माहितीची प्रत घेता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news