पुणे : तब्बल 26 वर्षांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण

पुणे : तब्बल 26 वर्षांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण

पौड : आत्मविश्वास व शिकण्याची जिद्द या जोरावर तब्बल 26 वर्षांनी भूगाव येथील दीपक मारुती करंजावणे यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. दीपक करंजावणे 1996 साली पिरंगुट इंग्लिश स्कूल येथे दहावीत असताना काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षेत यश संपादन करू शकले नाहीत.

सगळे मित्र दहावी उत्तीर्ण झाले आणि आपण अपयशी ठरलो याची सल त्यांच्या मनात कायम होती. त्यामुळे काहीही करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण व्हायचेच असा चंग त्यांनी बांधला होता. मार्च 2022 मध्ये ते दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झाले. सहा विषयांचे पेपरही व्यवस्थित दिले. अखेर परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.17) जाहीर झाला. दीपक करंजावणे हे 54.40 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले.

तब्बल 26 वर्षानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. दहावीतील अपयशानंतर ते सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिले. दरम्यान त्यांनी 2009 ते 2014 ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच पदाचा कार्यभार संभाळला. मुळशी तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून उपक्रम राबविले. सध्या ते भूगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आहेत. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल करंजावणे यांच्यावर मुळशी तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news