पुणे : तंत्रशिक्षण फेरपरीक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर; 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान भरता येणार विद्यार्थ्यांना अर्ज

पुणे : तंत्रशिक्षण फेरपरीक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर; 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान भरता येणार विद्यार्थ्यांना अर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'तंत्रशिक्षण परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान अर्ज भरता येईल,' अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी दिली आहे. उन्हाळी परीक्षा 2022 मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण मान्यताप्राप्त अभियांत्रिकी तसेच औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमातील अंतिम सत्र, वर्षातील अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेमध्ये अंतिम सत्र, वर्षातील अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुत्तीर्ण विषयांचा, तसेच बॅकलॉग विषयांची फेरपरीक्षा अपवादात्मक परिस्थितीत विशेष बाब म्हणून मंडळाच्या प्रचलित पद्धतीने मंडळाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा 2022 करिता अंतिम सत्र / वर्षांतील तसेच त्यांचे असलेले बॅकलॉग विषयांसाठी परीक्षा अर्ज विभागीय कार्यालयामार्फत निश्चित केला होता, तसेच उन्हाळी परीक्षा 2022 चा निकाल Fail/WFLS/WFLY असा असेल, त्याच विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुत्तीर्ण विषयांचे आकलन चांगले व्हावे यासाठी विषयनिहाय अतिरिक्त अध्यापन वर्ग संस्था स्तरावर आयोजित करावेत.

संबंधित वर्गास विद्यार्थ्यांची उपस्थिती राहण्याकरिता अध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. मंडळामार्फत निर्धारित केलेल्या फेरपरीक्षा आयोजनापूर्वी संस्था स्तरावर अशा विद्यार्थ्यांकरिता सराव परीक्षा आयोजित करावी. विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेबाबत मार्गदर्शन करावे. फेरपरीक्षा मंडळाच्या नियमावलीप्रमाणे सुरळीत पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेच्या प्राचार्यांची राहील, असे डॉ. चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे.

या तारखा लक्षात ठेवा परीक्षा अर्ज भरणे – 5 ते 7 सप्टेंबर
भरलेले परीक्षा अर्ज निश्चित – 5 ते 8 सप्टेंबर
विभागीय कार्यालयांकडून अर्ज निश्चित – 5 ते 9 सप्टें.
परीक्षा ओळखपत्र व सिटींग चार्ट प्रदर्शित – 13 सप्टें
प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा – 15 ते 17 सप्टेंबर
लेखी परीक्षा – 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news