पुणे : तंत्रशिक्षण डिप्लोमा प्रवेश नोंदणीस पुन्हा मुदतवाढ

पुणे : तंत्रशिक्षण डिप्लोमा प्रवेश नोंदणीस पुन्हा मुदतवाढ

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी आता 28 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत. प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास 2 जूनपासून सुरुवात करण्यात आली आहे.

त्यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. दि. 28 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च-एप्रिल 2022 या वर्षात इयत्ता दहावी परीक्षा दिली आहे, त्यांनी शैक्षणिक पात्रता तपशीलामध्ये स्वत:चा आसनक्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण करावेत, असेही सूचित करण्यात आले आहे.

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात – 2 जून
अर्ज नोंदणी करण्याची मुदत – 28 जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार – 30 जुलै
आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत – 30 जुलै ते 1 ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध – 2 ऑगस्ट

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news