पुणे : डीएसकेंची ठेवीदारांसाठी सकारात्मक भूमिका

पुणे : डीएसकेंची ठेवीदारांसाठी सकारात्मक भूमिका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले दीपक कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांनी ठेवीदारांना त्यांचा पैसा परत मिळावा, या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिका घेतली आहे. 'डीएसकेंनी आता थेट नॅशनल लॉ ट्रिबलकडे (एनसीएलटी) धाव घेत तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे,' अशी माहिती डीएसके यांचे वकील हृषिकेश करवंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन सध्याच्या दरानुसार करावे, तसे झाल्यास ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळू शकतात. ठेवीदार आणि देणेकरी यांचे पैसे परत करण्याची इच्छा आहे.

त्या संदर्भात त्यांनी संबंधित यंत्रणांना पत्रव्यवहार केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन 2016 नुसार केले आहे. त्यानुसार लिलाव झाल्यास याचा देणीदारांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे सध्याच्या दरांनुसार मूल्यमापन केल्यास सर्व देणीदारांची रक्कम देता येईल. प्राधिकरणाकडे आलेल्या प्रस्तावातही किंमत कमी दाखवण्यात आली आहे,' असे अ‍ॅड. करवंदे यांनी सांगितले. 'डीएसके यांच्या कंपनीच्या दिवाळखोरीसंदर्भात 30 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

त्याचदरम्यान राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणात त्यांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रियाही सुरू होणार आहे. त्यासाठी एक प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावात मात्र डीएसके यांच्या सर्व मालमत्तांचे मूल्यमापन 2016 नुसार करण्यात आले आहे. त्यामुळे ते सध्याच्या दरांनुसार अतिशय कमी आहे. त्यानुसार लिलाव केल्यास कमी रक्कम मिळेल. त्यातून सर्वच गुंतवणूकदार, तसेच देणीदारांची देणी देणे शक्य नाही. यातून सर्वांनाच फटका बसेल. त्यामुळे हे मूल्यमापन करण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करावे. नवे रेडिरेकनरचे दर लावण्यात यावेत,' अशी मागणी अ‍ॅड. करवंदे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news