पुणे : जुन्नरला ओढ्यात वाहून गेलेला युवक सुखरूप

गोद्रे (ता. जुन्नर) येथील ओढा पार करताना वाहून जाणारा युवक.
गोद्रे (ता. जुन्नर) येथील ओढा पार करताना वाहून जाणारा युवक.
Published on: 
Updated on: 

जुन्नर, पुढारी वृतसेवा : शेतातून घरी जात असताना गोद्रे (ता. जुन्नर) येथील एक युवक बुधवारी (दि. 13) दुपारी ओढ्यात वाहून गेला होता. एकनाथ सोपान रेंगडे (वय 35) असे या युवकाचे नाव असून, एक तासानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला वाचविण्यात आले.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ओढ्याला पाणी आले होते. दरम्यान, या ओढ्यावर पूल बांधण्यात येणार असून, या कामाचे उद्धाटन दोन महिन्यांपूर्वीच झाले होते. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या साकवचे काम ऑक्टोबर दरम्यान सुरू करणे सोयीचे असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

या घटनेत एकनाथला पायाला मार लागला असून उपचारासाठी जुन्नर येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडत असतानाचा व्हिडिओ ओढ्याशेजारी उभ्या असलेल्या मुलांनी काढला असून, तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

Extortion News
Pune Drainage Accident Death
Shakambhari Devi
Pune Graduate Teacher Constituency Election
logo
Pudhari News
pudhari.news