पुणे जिल्ह्यात तीन लाख लसी…

पुणे जिल्ह्यात तीन लाख लसी…
Published on
Updated on

पुणे : दोन आठवड्यांपूर्वी कोव्हिशिल्ड लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने मोफत बूस्टर डोस घेणार्‍यांची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता पुणे जिल्ह्याकडे कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, कॉर्बेव्हॅक्स या तिन्ही मिळून 3 हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी नागरिकांनी निष्काळजी न राहता लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

मुबलक साठा
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना कोर्बेव्हॅक्स लसीचाही तिसरा डोस देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्याकडे लसींचा मुबलक साठाही उपलब्ध आहे.

राज्याकडून जिल्ह्यासाठी लसींचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्याकडे 1 लाख 2 हजार 760 कोव्हिशिल्ड, 1 लाख 2 हजार 230 कोव्हॅक्सिन, तर 1 लाख 4 हजार 540 कोर्बेव्हॅक्स लसी, अशा एकूण 3 लाख 9 हजार 530 लसी उपलब्ध आहेत. नागरिकांनी लसीकरण करून घेण्यास प्राधान्य द्यावे.

                          – डॉ. संजोग कदम, आरोग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ

अशी आहे उपलब्धता
विभाग कोव्हिशिल्ड कोव्हॅक्सिन कॉर्बेव्हॅक्स एकूण
पुणे शहर 53110 61180 62480 176770
पिंपरी-चिंचवड 29860 31410 23680 84950
ग्रामीण 19790 9640 18380 47810
एकूण 102760 102230 104540 309530

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news