पुणे : जिल्ह्यात तलाठ्यांची 75 पदे रिक्त

पुणे : जिल्ह्यात तलाठ्यांची 75 पदे रिक्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा : गाव तलाठी हा महसूल विभागाचा महत्त्वाचा घटक असून, शेतजमिनीच्या नोंदी ठेवण्यापासून ते शेती नुकसानीची नोंद घेण्याचे महत्त्वाचे काम असते, परंतु जिल्ह्यात तलाठ्यांची 75 पदे रिक्त आहेत.

एक उपजिल्हाधिकारी, दोन तहसीलदार, 15 नायब तहसीलदारांची पदेही रिक्त असल्याने त्याचा थेट कामकाजावर परिणाम होत
आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील तहसील, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांत असलेल्या रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. त्यातच जिल्हा पुरवठा आणि अन्न धान्य वितरण कार्यालयातील कर्मचार्‍यांना मूळ पदांवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे धान्य वितरणाला विलंब होत आहे, तर गावपातळीवर महत्त्वाचे असलेल्या तलाठीची 616 पदे मंजूर असून, त्यातील 75 पदे रिक्त आहेत.

त्यामुळे एका तलाठ्यावर अनेक गावांचा पदभार देण्यात आला आहे. परंतु तलाठी शेतकर्‍यांना वेळेत भेटत नाहीत. तसेच कार्यालयीन कामकाजात शिपायाची महत्त्वाची भूमिका असून, त्यांची जिल्ह्यात 198 पदे मंजूर असून, त्यातीलही 61 पदे रिक्त आहेत. तलाठ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी पद असून, जिल्ह्यात पदोन्नतीने 119 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 113 पदे कार्यरत असून, 6 पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कामकाजात अव्वल कारकूनचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांची पदोन्नतीने 204 पदे मंजूर असून, प्रत्यक्षात 218 जण कार्यरत आहेत. महसूल सहायकांची 322 पदे मंजूर आहेत. त्यातील 315 पदे भरली गेली असून, 7 पदे रिक्त आहेत. वाहनचालकांच्या 42 मंजूर पदांपैकी 15 पदे रिक्त आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news