पुणे : जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव रविवारी

पुणे : जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव रविवारी

पुणे : ओडिसातील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा यंदा आषाढ महिन्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात आंतरराष्ट्रीय कृष्णभा  वनामृत संघातर्फे (इस्कॉन) जगन्नाथ रथयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नटवर दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सोहळ्याला रविवारी (3 जुलै) दुपारी 12 वाजता जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथून सुरुवात होणार आहे.

इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची दया जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली. हॉटेल सेंट्रल पार्क येथे रविवारी दुपारी 12 वाजता मान्यवरांच्या हस्ते रथयात्रेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर आरती होणार असून दुपारी 1.30 वाजता रथयात्रेस प्रारंभ होईल. जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे हॉटेल सेंट्रल पार्क येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news