पुणे : ‘चेक बाउन्स’मधील 3 कोटी वारसांना द्या

पुणे : ‘चेक बाउन्स’मधील 3 कोटी वारसांना द्या

Published on

मंचर, पुढारी वृत्तसेवा : अवसरी खुर्द भोरवाडी (ता. आंबेगाव) येथील जमीन खरेदी प्रकरणात खरेदीदाराने जमीन खरेदीसाठी दिलेले 1 कोटी 94 लाख रुपये किमतीचे चेक बाउन्स झाल्याप्रकरणी घोडेगाव येथील दिवाणी न्यायालयाने निकाल देत खरेदीदार आरोपीस सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, जमीन-विक्रीची किंमत व्याज व इतर खर्च मिळून 3 कोटी रुपये फिर्यादी निराभाऊ भोर यांच्या वारसांना देण्याचे आदेश दिले आहेत.

चंद्रकांत निराभाऊ भोर, बाळू निराभाऊ भोर, रामदास निराभाऊ भोर, सुमन सूर्यकांत काळे यांनी संजय वामनराव बाणखेले (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांना विकली. बाणखेले यांनी भोर यांना 15 लाख रुपये रोख दिले. उर्वरित रक्कम 1 कोटी 94 लाख रुपयांचे अशोक नागरी सहकारी बँक पिंपरी पुणे यांच्या नावे 4 चेक दिले होते. जमीन बाणखेले यांच्या नावावर झाली. दरम्यान, बाणखेले यांनी दिलेले चारही चेक बाउन्स झाले. याबाबत आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच भोर यांनी राजगुरुनगर येथील अ‍ॅड. अर्चना गायकवाड यांच्या माध्यमातून बाणखेले विरुध्द घोडेगाव येथील दिवाणी न्यायालयात 138 प्रमाणे खटला दाखल केला होता.

भोर कुटुंबीयांच्या बाजूने अ‍ॅड. अर्चना गायकवाड यांनी गेली पाच वर्षे बाजू मांडली. घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. चोखट यांनी सर्व साक्षी-पुरावे तपासून भोर यांच्या बाजूने दि. 1/8/2022 रोजी निकाल देत आरोपी संजय वामनराव बाणखेले याला सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, जमिनी खरेदीची रक्कम, त्यावरील व्याज इतर खर्च, असे एकूण 3 कोटी रुपये जमिनीच्या भोर कुटुंबीयांना देण्याचे आदेश दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news