पुणे : गाडी 100 फूट दरीत कोसळली

पुणे : गाडी 100 फूट दरीत कोसळली

वाडा, पुढारी वृत्तसेवा: नायफड (ता. खेड) येथील घाटात इको गाडी चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळली असून त्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (दि. 16) सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील पश्चिम भागात सध्या भात लागवड चालू झाली आहे. भात लागवडीसाठी भिवंडी येथून मिलखे कुटुंब इको (एमएच 12 टीएन 9483) गाडीने येत होते. पहाटेची वेळ असल्याने चालकाचा ताबा सुटल्यानंतर ही गाडी नायफडच्या माचन परिसरातील वळणावर दरीत कोसळली. घाटात मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने गाडी पलटी होऊन गाडीचा मागचा भाग हिरडीच्या झाडावर आपटला.

त्यानंतर गाडी पलटी होऊन घसरत 100 फूट खोल दरीत पडली. सुदैवाने ईकोमध्ये असलेल्या सातही प्रवाशांचा जीव वाचला असून त्यातील चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये तीन महिला आहे. यामध्ये शारदा सुरेश मिलखे, संजा विठ्ठल सुपे, अक्षदा सुरेश मिलखे व शांताराम विठ्ठल मिलखे यांचा समावेश आहे. यापैकी संजा विठ्ठल सुपे यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती स्थानिक नागरिक सांगता आहेत. भिवंडी येथून भात लावणीसाठी आलेल्या मिलखे कुटुंबाचा अपघात झाल्याने नायफड गावात हळहळ व्यक्त करत आहेत. जखमींना राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news