पुणे : गणेशोत्सवात दुपारनंतर मध्यवस्तीत नो-एन्ट्री

पुणे : गणेशोत्सवात दुपारनंतर मध्यवस्तीत नो-एन्ट्री

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वैभवशाली परंपरा असलेला पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी असते. देखावे व आकर्षक रोषणाई, सजावट पाहण्यासाठी शहराबरोबरच बाहेरचे नागरिक पुण्यात येतात. त्यामुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता एक ते आठ सप्टेंबरदरम्यान दुपारी तीनपासून आवश्यकतेनुसार मध्य भागातील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

बंद रस्ता : लक्ष्मी रस्त्यावरील हमजेखान चौक ते टिळक चौक

पर्यायी रस्ता : डुल्या मारुती चौक, दारुवाला पूल, अपोलो टॉकीज पाठीमागील मारणे रस्त्यावरून सिंचन भवन, शाहीर अमर शेख चौक, कुंभारवेस चौक, म.न.पा. भवन पाठीमागील रस्त्याने इच्छित स्थळी जावे. हमजेखान चौक डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने सरळ घोरपडी पेठ पोलिस चौकी पुढे शंकर शेठ रस्त्याने इच्छित स्थळी जावे.

बंद रस्ता : शिवाजी रस्त्यावरील स. गो. बर्वे ते जेधे चौक

पर्यायी मार्ग : शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक, जे. एम. रस्ता- अलका चौक टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौक मार्गे नेहरू रस्त्याचाच वापर करून स्वारगेटकडे जाणार्‍या रस्त्याचा वापर करावा.

-कुंभारवेस चौक- पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रस्ता मार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी, घोरपडी पेठ उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रस्ता वापरावा.

– वाहतुकीचे परिस्थितीनुसार गाडगीळ पुतळ्यापर्यंत येणारी दुचाकी वाहने ही लालमहलपर्यंत सोडण्यात येतील. तेथून दुचाकी वाहनचालकांनी डावीकडे फडके हौद चौकाकडे किंवा उजवीकडील फुटका बुरुजकडून इच्छितस्थळी पुढे जाणे.

बंद रस्ता : बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते आप्पा बळंवत चौक
पर्यायी रस्ता : पूरम चौक, टिळक चौकातून उजवीकडे वळून केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक असा वापरावा.
(पूरम चौक ते गाडीतळ पुतळा येथे जाण्यासाठी करण्यात आलेली एकेरी वाहतूक रस्त्यावर टेलिफोन भवन ते पूरम चौक या दरम्यानच्या रस्त्यावर नमूद कालावधीसाठी तात्पुरती एकेरी वाहतूक शिथिल करून दुहेरी करण्यात येणार आहे.)

बंद रस्ता : टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ते हिराबाग चौक
पर्यायी रस्ता : जेधे चौक, नेहरू स्टेडियमसमोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा, उजवीकडे वळून पूरम चौक, हिराबाग.
(पीएमपीएल बस व तीनचाकी रिक्षा वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना येथे बंदी असणार आहे.)

बंद रस्ता : सिंहगड गॅरेज, घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण ते हिराबाग चौक
पर्यायी रस्ता : सिंहगड गॅरेज चौकातून सरळ झगडेवाडी, वेगासेंटर (शंकरशेठ रोड) येथून वाहनचालकांनी इच्छित स्थळी जावे.

बंद रस्ता : दिनकर जवळकर पथ ते पायगुडे (जोशी आळी) हिराबाग चौक
पर्यायी रस्ता : दिनकरराव जवळकर पथने सरळ बाजीराव रोड, डावीकडे वळून टेलिफोन भवन ते पूरम चौक, टिळक रोडने वाहनचालकांनी इच्छित स्थळी जावे.

बंद रस्ता : कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ (जगदीश गॅरेज उपरस्ता) ते टिळक रोडकडे जाण्यास बंदी.
पर्यायी रस्ता :  लहान रस्ता असल्याने पर्यायी मार्ग दिलेला नाही. (गल्ली आहे.)

बंद रस्ता : सणस रोड : गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक
पर्यायी रस्ता: गोटीराम भैय्या चौक, गाडीखाना, सुभेदार तालीम, डावीकडे वळून कस्तुरे चौक, डावीकडे वळून गोविंद हलवाई चौक या रस्त्याचा वापर करावा.

बंद रस्ता : पानघंटी चौक ते गंजपेठ चौकी
पर्यायी रस्ता : पानघंटी चौक, जैन मंदिर चौक, फूलवाला चौक, कस्तूरे चौक, उजवीकडे वळून गंज पेठ चौकीमार्गे इच्छित स्थळी जावे.

बंद रस्ताः गावकसाब मशिद ते सेंट्रल स्ट्रीट चौकी
अ. पर्यायी रस्ता : गावकसाब मशिद, बाबाजान चौक, सरबतवाला चौक, सेंट्रल स्ट्रीट चौकी.
ब. गावकसाब मशिद, सेंट्रल स्ट्रीट, इंदिरा गांधी चौक, डावीकडे वळून भगवान महावीर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.

बंद रस्ताः कोहिनूर चौक ते बाबाजान चौक
पर्यायी मार्ग: कोहिनूर चौक, भगवान महावीर चौक, डावीकडे वळून सरबतवाला चौक, डावीकडे वळून बाबाजान चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

बंद रस्ताः जेधे प्रसाद रस्ता, सुभानशहा रस्ता, पार्श्वनाथ चौक (नाईक हॉस्पिटल) ते शास्त्री चौक, सुभानशहा दर्गा ते सोन्या मारुती चौक.
पर्यायी रस्ता: पार्श्वनाथ चौक (नाईक हॉस्पिटल) ते डावीकडे वळून सुभेदार तालीम चौक, सरळ शिवाजी रोडने शिंदे आळीतून इच्छित स्थळी जावे किंवा पार्श्वनाथ चौक, फूलवाला चौक, कस्तूरे चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.

या रस्त्यावर असेल 'नो-पार्किंग'
शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते गोटीराम भैय्या चौक
मंडई ते शनिपार चौक
बाजीराव रस्त्यावरील शनिपार ते फुटका बुरूजपर्यंत
आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंत

…येथे करा वाहने पार्किंग
विमलाबाई गरवारे कॉलेज, एच. व्ही. देसाई कॉलेज, मनपा विद्यालय, पुलाची वाडी नदी किनारी, दारूवाला पूल ते खडीचे मैदान, काँग्रेस भवन मनपा रस्ता, व्होल्गा चौक ते मित्रमंडळ चौक, कॅनॉलच्या कडेस, पूरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याची डावी बाजू, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, सर्कस मैदान, टिळक पूल ते भिडे पूल नदी किनारी, नारायण पेठ,

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news