पुणे : गणेशोत्सवात ‘आवाज’ पाच दिवस

पुणे : गणेशोत्सवात ‘आवाज’ पाच दिवस

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषणासंबंधी नियमांचे पालन करून यंदा गणेशोत्सवादरम्यान 4 ऐवजी 5 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पाच दिवस देखावे पाहता येणार आहेत. ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केला आहे. पुण्यातील सार्वजनिक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास 4 ऐवजी 5 दिवस परवानगी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौर्‍यादरम्यान दिल्या होत्या.

त्यानुसार पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिलेल्या गणेशोत्सवाखेरीज इतर सण, उत्सव, तसेच जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी शनिवार, 3 ते 7 सप्टेंबर आणि शुक्रवारी (9 सप्टेंबर) या कालावधीत एकूण 5 दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

4 ऐवजी यंदा 5 दिवस
कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निर्बंध येत होते; परंतु यंदा उत्सव पूर्ण निर्बंधमुक्त साजरा करता येणार आहे. सार्वजनिक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यंदा शेवटचे 4 ऐवजी 5 दिवस नागरिकांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत देखावे खुले असणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news